मालवण हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्हाच्या मालवण ह्या प्रमुख तालुक्याचे ते ठिकाण आहे. मालवण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. मालवण तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत तालुका आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यात मालवण तालुक्याचे ६०% योगदान होते.